⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | जय बाबाजी परिवार करणार एक तासात पाच लाख वृक्ष लागवड

जय बाबाजी परिवार करणार एक तासात पाच लाख वृक्ष लागवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. वनचरे या उक्तीप्रमाणे जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने महाश्रमदान सोहळ्यांतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जय बाबाजी भक्त परिवारातर्फे चौथ्या श्रावणी सोमवार पर्वकालावर सकाळी ८ ते ९ या वेळेत ५ लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहीमेत सहभागी व्हावे व इतरांनाही सहभागी करावे असे स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी केले आहे.

चौथ्या श्रावण सोमवारी म्हणजेच 22 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या राहत्या घराच्या परिसरामध्ये किंवा शेतामध्ये वन फॅमिली टु ट्रीज’ यानुसार एका कुटुंबाने कमीत कमी दोन रोपांची लागवड करावी असे नियोजन करण्यात आले आहे. जय बाबाजी भक्त परिवार संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ही मोहीम यशस्वीपणे राबवणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह