⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सामाजिक | छ. शाहू महाराजांच्या विचारामुळे महाराष्ट्र सुजाण व सुबुद्ध – ना. गुलाबराव पाटील

 छ. शाहू महाराजांच्या विचारामुळे महाराष्ट्र सुजाण व सुबुद्ध – ना. गुलाबराव पाटील 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ६ मे २०२२ | शाहू महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समिती च्या वतीने काव्यरत्नावली चौकात आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शाहू महाराजांच्या विचारामुळेच आज महाराष्ट्र हा सुजाण व सुबुद्ध लोकांचा प्रदेश आहे.

यामुळेच विद्वेशाच्या या आवाजाला समाजात स्थान नाही. याचं कारण शाहू महाराजांचे सामाजिक एकतेचे विचार मनामनात आहेत सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्यावतीने शंभु पाटील यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी मा आ चंद्रकांत सोनवणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, मुकुंद सपकाळे,  मनसेचे जमील देशपांडे, भाजपचे दिपक सूर्यवंशी राष्ट्रवादीचे पुरुषोत्तम चौधरी, विनोद देशमुख, अश्विनीताई देशमुख, शिवसेनेच्या सरिता माळी, शोभा चौधरी, विराज कवडिया, समितीचे राम पवार, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील , खुशाल चव्हाण, फईम पटेल, वसंत गायकवाड, नितीन सोनवणे, सुरेश मराठे, भूषण गुरव, रवी जोशी, विकास वाघ, विजय पालवे, शरद पाटील व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. 

author avatar
टीम जळगाव लाईव्ह