fbpx

पाटणादेवी मंदिराकडे जाणारा लोखंडी पूल पुन्हा भाविकांच्या सेवेत सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदीर व जंगल परिसरात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यात पाटणादेवी मंदिराकडे जाणारा लोखंडी पूल वाहून गेल्याने भाविकांना पाटणादेवी मंदिरात दर्शनासाठी जाणे बंद झाले होते. भाविकांची अडचण लक्षात घेऊन खासदार उन्मेश पाटील यांनी वनविभाग व पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून लोखंडी पूल लागलीच तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा लोखंडी पूल तयार करण्यात आला असून दि.९ रोजी हा लोखंडी पूल पुन्हा भाविकांच्या सेवेत सुरू झाला आहे.

नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून मंदिरे दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. त्यामुळे गौताळा अभयारण्यात असलेल्या पाटणादेवी मंदीरातही भाविकांची गर्दी वाढणार होती. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत मंदिरात जाण्यासाठीचा लोखंडी पूल वाहून गेला होता. यामुळे भाविकांना पाटणादेवीचे दर्शन घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. यामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले होते. दरम्यान, खासदार उन्मेश पाटील यांनी राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करून तातडीने हा लोखंडी पूल तयार करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गेल्या चार दिवसात रात्रंदिवस काम करून हा लोखंडी पूल तयार करण्यात आला. शनिवार दि.९ रोजी या लोखंडी पुलावरून भाविकांची ये-जा सुरू झाल्याने पाटणादेवीचे दर्शन करण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.

mi advt

पाटणादेवी मंदिराकडे जाणारा लोखंडी पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी तातडीने आमच्या विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क करून हा लोखंडी पुल तयार करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गेल्या चार पाच दिवसात रात्रंदिवस काम करून हा लोखंडी तयार करण्यात आला असून हा आज भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती पुरातत्व विभाग औरंगाबादचे वरिष्ठ संरक्षक अभियंता राकेश शेंडे यांनी दिली आहे.

भाविकांची गैरसोय दूर
पाटणादेवी मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवात राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आल्याने भाविकांची गर्दी होणार होती, मात्र अतिवृष्टीमुळे लोखंडी पूल वाहून गेल्याने भाविकांना दर्शनाला जाणे शक्य नव्हते. ही अडचण खासदार उन्मेश पाटील यांनी तातडीने दूर केली असून आज हा लोखंडी पूल भाविकांना ये-जा करण्यासाठी खुला करण्यात आला आहे. भाविकांची अडचण दूर झाल्याने खा. उन्मेश पाटील यांना धन्यवाद देतो, अशी भावना पाटणा गावाचे सरपंच नितीन पाटील यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज