गुंतवणूकदारांचे एका दिवसात ७.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान; ‘या’ कारणामुळे झाली मोठी घसरण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । कोविडच्या नवीन आणि धोकादायक प्रकारांबद्दल माहिती मिळाल्याने आज (दि.२६) बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात तब्बल ७.४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आठवड्याच्या शेवट दिवशी सेन्सेक्स १६८८ अंकांनी घसरून ५७१०७ तर निफ्टी ५१० अंकांनी घसरून १७०२६ च्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारात आज (दि.२६) फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. सर्वाधिक फटका रिॲल्टी क्षेत्राला बसला बसला. शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर, ‘बीएसई’वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप २५८.२१ लाख कोटी रुपयांवर आले. एका दिवसापूर्वी ते २६५.६६ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच कोविडच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचे एका दिवसात ७.४५ लाख कोटी रुपये बुडाले. आज रिअल्टी क्षेत्र निर्देशांक ६.२६ टक्के, धातू क्षेत्र निर्देशांक ५.३४ टक्के, वाहन क्षेत्र ४.३४ टक्के, सार्वजनिक क्षेत्रातील बँक निर्देशांक ४.२१ टक्के, बँकिंग क्षेत्र ३.५८ टक्के. वित्तीय सेवा क्षेत्र ३.५६ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले तर फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्राचे निर्देशांक सुमारे २-२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

कोविडचा नवीन प्रकार बाजारातील घसरणीला कारणीभूत असल्याचे मानले जाते, शास्त्रज्ञांनी त्याचे चिंतेची बाब म्हणून वर्णन केले आहे. सध्या, या प्रकाराबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला हा नवीन प्रकार B.1.1 पेक्षा जास्त धोकादायक असण्याची शक्यता आहे. कोविड लस त्यावर कुचकामी ठरण्याची शक्यता असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. नवीन प्रकारांच्या आगमनाने, अनेक देशांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. सध्या जगातील अर्थव्यवस्थांमध्ये रिकव्हरीमध्ये स्थिरता नाही, अशा परिस्थितीत नवीन व्हायरसच्या प्रभावामुळे रिकव्हरी पूर्णपणे रुळावर येऊ शकते, अशी भीती बाजाराला आहे. अनिश्चितता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी आज (दि.२६) बाजारात विक्री केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -