महिलेच्या खुनाचा उलगडा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । भुसावळ येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या सुचिता शुभम बारसे (25) या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या चार तासात झाला आहे. कौटुंबिक वादातून महिलेचा पती तथा संशयीत आरोपी शुभम चंदन बारसे (26, कवाडे नगर, भुसावळ) यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

याबाबत असे की, भुसावळातील कवाडे नगरातील रहिवासी असलेल्या सुचिता बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती. सुचिता बारसे व पती शुभम बारसे यांच्यात या ना त्या कारणावरून खटके उडत असल्याने आरोपीने पत्नीला एका ठिकाणावरून नेत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात रात्रीच्या सुमारास आणले.

संशयीत आरोपी पतीने घरातील चाकूच्या सहाय्याने पत्नीवर आधी सपासप वार केले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली. काही वेळेतच उपस्थित नागरीकांच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar