रावेर नगरपालिकेच्या क्रॉंक्रीटीकरण कामाची चौकशी करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । रावेर शहरात नगर पालिका हद्दीत सुरु असलेले क्रॉक्रीटीकरण व गटार बांधकाम अत्यंत निकृष्टदर्जाचे होत असून हे कामे त्वरीत थांबविण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रावेर नगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी गटार बांधकाम व क्रॉक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. मात्र हि कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून याकामांवरील शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे . येथील गट नंबर ११४८ मधील काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काँक्रीटीकरण करताना बांधकामाच्या नियमांना डावलून ठेकेदार जमिनीवर खडी पसरवून त्यावर केवळ काँक्रीट टाकत आहे.

बाबत ठेकेदाराला जाब विचारला असता तुम्हाला हे करायचे ते करा, हे काम असेच होईल असे उत्तर दिले जात आहे. तर मदिना कॉलनीतील गटारीचे बांधकाम व काँक्रिटीकरणाचे काम याच पद्धतीने पूर्ण केले आहे. ईदगाह रोडवरील काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे झालेले आहे . नागरिकांनी नगरपालिकेत तक्रार केली असता त्याची दखल अधिकारी व पदाधिकारी घेत नाही. यासर्व कामांची आपल्या स्तरावरून चौकशी करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी डी. एस. सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी देखील उपस्थीत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -