fbpx

मनपाच्या दवाखान्यातील इन्व्हर्टरची बॅटरी चोरणारे ताब्यात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ – पिंप्राळा हुडको भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर बॅटरी चोरणारे अल्पवयीन मुलांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पिंप्राळा हुडको परिसरातील मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टरची बॅटरी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी आरोग्य कर्मचारी सुनिल पाटील यांच्या तक्रारीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने विधीसंघर्षीत बालकांसह त्यांनी घरात लपवून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, पंकज शिंदे, यांनी सहभाग घेतला. पुढील कारवाईसाठी बालकांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज