fbpx

जळगाव विभागाकडून आंतरराज्य बस सेवा सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ जुलै २०२१ । महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बस सेवा ७ जून पासून पुन्हा सुरु करण्यात आलीय. मात्र, यामध्ये आंतरराज्य बस सेवा बंद होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत. दरम्यान, याच अनुषंगाने जळगाव विभागाने आंतरराज्य बस सेवा सुरू केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर बस सेवा सुरु करण्यात आली होती. त्यात आंतरराज्य बस सेवा देखील सुरु होती. मात्र, गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यात अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा सुरु होती. परंतु कोरोणा नियंत्रित झाल्याने सात जून पासून राज्यातील बस सेवा सुरू करण्यात आली होती. 

मात्र, आंतरराज्य बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत होते. आंतरराज्य बस सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आज जळगाव विभागातील चोपडा- सुरत, चाळीसगाव-सुरत, अमळनेर-बडोदा, पाचोरा- सुरत, एरंडोल- सुरत, जळगाव -वापी,जामनेर- सुरतला बसेस रवाना झाल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य प्रमाणे गुजरात राज्य परिवहन महामंडळाने देखील महाराष्ट्र राज्यात गुजरातच्या बसेस सुरू केल्या आहेत. गुजरात राज्यातील सुरत-शिर्डी, सुरत-मालेगांव,सुरत-नवापूर बसेस महाराष्ट्र सुरू झाल्या आहेत. या निर्णयाने महामंडळाचे आर्थिक चक्र गतिमान होईल गेल्या अनेक दिवसापासून बस सेवा बंद असल्याने महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज