fbpx

अमळनेर-चोपडा आगारातून आंतरराज्य बस सेवा सुरु ; जाणून घ्या वेळ

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जुलै २०२१ । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली सर्वसामन्यांची जीवनवाहिनी एसटी बस आता पुन्हा एकदा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’धावण्यास सज्ज होत आहेत. आज मंगळवारपासून अमळनेर व चोपडा येथून आंतरराज्य बस सेवा सुरु करण्यात आली आहे. यात दोन्ही आगारातून सुरत, बडोदा, वापी येथे बस सेवा सुरु करण्यात आली. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले होते. या निर्बधानंतर एसटीतून अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वाहतूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर सर्वसामान्यांसाठी एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. 

परंतु राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर एसटी बसमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आज मंगळवार सकाळी अमळनेर आणि चोपडा बस आगारातून गुजरातला जाणाऱ्या आंतरराज्य बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. या सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

असा आहे टाईम?

अमळनेर आगारातून सकाळी सुरतसाठी ७.४५ वा. रोज बस सुटेल, तर सकाळी ९ वाजेला बडोदा बस सुटेल.

चोपडा आगारातून  सुरतसाठी सकाळी ७:१५ आणि दुपारी १२.३० ला बस सुटेल.  पावगडसाठी सकाळी ४.७० वा., बडोद्यासाठी सकाळी ९.५० वा. तर वापीसाठी ९.०० वाजेला बस सुटेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज