अमळनेर येथे अतिक्रमणविरोधी पथकाला शिवीगाळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील बसस्थानकासमोर अतिक्रमणात असलेली हातगाडी काही दिवसांपूर्वी हटवली होती. मात्र, हटवलेली हातगाडी पुन्हा लावल्याने, ती हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला हातगाडी चालकाने शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना २० रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, अमळनेर येथील बसस्थानकासमोर पालिका व पोलिस प्रशासनाने दोन दिवसांपुर्वी अतिक्रमण हटवले होते. या ठिकाणी हटवलेली हातगाडी पुन्हा लावल्याने, ती हटवण्यासाठी गेलेल्या पथकाला हातगाडी चालकाने शिवीगाळ करून दमदाटी केली. २० रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व सहकारी अतिक्रमण काढायला गेले. त्यावेळी संशयित हातगाडीचालक युनूस भटू बागवान ( वय माहित नाही ) याने पथकाला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज