पारोळ्यात बीडीओंना शिवीगाळ, माजी जिल्हा परिषद सदस्यांवर गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । पाराेळा येथील पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांना त्यांच्या दालनात जाऊन अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याविराेधात कलम १८६ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना १२ राेजी दुपारी ४ वाजता त्यांच्या दालनात जाऊन नागरिकांसमोर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग महादू पाटील यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत एकेरी भाषेत धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा केल्याबाबत त्यांच्यावर गटविकास अधिकारी लाेंढे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पारोळा पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पारोळा पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. या घटनेचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणातील संशयित पांडुरंग पाटील हे विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी सभापती सुनंदा पाटील यांचे पती आहेत. याबाबत बापू पाटील तपास करत आहे.

दरम्यान, मी विस्तार अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना माजी जिल्हा परिषद सदस्यांनी येवून माझ्याशी एकेरी भाषेत उल्लेख करत शिवीगाळ केली, असे बीडीओ विजय लाेंढे यांनी सूत्रांना सांगितले. तर एका माध्यम प्रतिनिधीला माहिती न देता त्याला बाहेर ताटकळत ठेवले हाेते. याचा जाब विचारण्यासाठी गेलाे असता विजय लाेंढे यांनी उद्धट भाषा वापरली. मी शिवीगाळ केलेली नाही, आराेप निराधार असल्याचे माजी जि.प. सदस्य पांडुरंग पाटील यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -