विनातिकीट रेल्वे प्रवास करताय ; तर वाचा रेल्वेचे नवे नियम !

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । भारतात कुठेही प्रवास करताना सुरक्षित, वेगवान आणि खिशाला परवडणारा पर्याय म्हणून रेल्वे प्रवासाकडे पाहिलं जातं. मात्र रेल्वे प्रवास करत असताना तुम्हाला रेल्वेचे काही नियम माहीत असणं गरजेचं आहे. दरम्यान तुम्हाला अचानक कधीतरी रेल्वे प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नाही, अशा प्रसंगाला तुम्ही सामोरं जात असाल तर घाबरण्याची आवश्यकता नाही.

कारण भारतीय रेल्वेनं नुकताच एक नवा नियम जारी केलाय. त्यात तुम्हाला एकाद्या वेळेस आवश्यक कामासाठी तातडीनं रेल्वे प्रवास करावा लागणार असेल तर तुम्ही केवळ प्लॅटफॉर्म तिकीट काढून रेल्वेत चढू शकता. त्यानंतर रेल्वेत टीटीईशी संपर्क साधून तुम्ही त्यांच्याकडून तिकीट घेऊ शकता.

प्लॅटफॉर्म तिकीटासहीत रेल्वेत चढल्यानंतर तुम्हाला तिकीट चेकरशी संपर्क साधावा लागेल. टीटीईकडून तुम्हाला हव्या असलेल्या स्टेशनपर्यंत तिकीट बनवून मिळेल.

रेल्वेत सीट रिकामी नसल्यास टीटीईकडून तुम्हाला जागा मिळू शकणार नाही मात्र, प्रवास करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. आरक्षित तिकीट नसल्यास प्रवासी २५० रुपये दंड भरून आपल्या प्रवासाचं एकूण भाडं देऊन तिकीट बनवून घेऊ शकतात.

रेल्वेच्या नियमानुसार, एखाद्या वेळी काही कारणास्तव तुमची आरक्षित जागा असलेली रेल्वे सुटली तरी पुढच्या दोन स्टेशनपर्यंत टीटीई तुमची जागा कुणालाही देऊ शकत नाही. म्हणजेच पुढच्या दोन स्टेशनपर्यंत तुम्ही रेल्वेच्या आधी पोहचलात तर आपल्या आरक्षित जागेवरून तुम्ही आपला प्रवास पूर्ण करू शकाल. मात्र, दोन स्टेशननंतर टीटीई आरएसी तिकीटासहीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही जागा देऊ शकतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -