fbpx

डोंगर कठोराच्या शौचालयांच्या कामांची चौकशी करा : ग्रामस्थांची तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन सुरू असलेले महीला शौचालयाचे काम ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ठ प्रतिचे करण्यात येत आहे. सदरचे काम हे येणाऱ्या पावसाळ्यातच कोसळ्ण्याची भिती ग्रामस्थांकडुन करण्याात येत असून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या कामाची स्वताः चौकशी केल्याशिवाय कामाची रक्कम ठेकेदारास अदा करू नये अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, डोंगर कठोरा येथील वड्री रस्त्यावरील आदीवासी  तडवी वस्तीजवळ ग्रामपंचायतच्या माध्यमातुन गावातील भागात शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून महीला शौचालय बांधण्यात येत असून या कामाच्या ठेकेदाराने शासनाने ठरवुन दिलेल्या अटीशर्तींना धाब्यावर ठेवुन सदरील शौचालयाची कामे अत्यंत निकृष्ठ प्रतिची केली. चुकीचे व निकृष्ठ साहीत्य वापरून केलेले या शौचालयाची छत व बांधकाम येणाऱ्या पावसाळयात कोसळण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली असुन वेळीच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यावल यांनी दखल घेवुन चौकशी करून ठेकेदाराने केलेल्या कामांची गुणवत्ता तपासावी अन्यथा पावसाळ्यात या शौचालयात मोठी दुर्घटना होवुन निरपराध महीलांना आपले जिव गमवावे लागु शकता अशी संत्पत व प्रशासनास सावधान करणारी प्रतिक्रिया डोंगर कठोरा ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

mi advt

या आदी देखील ठेकेदारांनी  अशाच प्रकारची शासनाकडुन प्राप्त लाखो रुपयांच्या निधीतुन संबंधीत ठेकेदारांनी विविध विकासाची कामे ही अत्यंत निकृष्ट प्रतिची केलेली आहे. यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सामाजीक कार्यकर्त्यांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करीत काही दलाल मंडळींच्या मध्यस्थीने त्यांची लाखो रुपयांची बिले काढुन दिल्याची चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज