एरंडोलात प्लास्टीक पिशवी अंत्ययात्रेचा अभिनव कार्यक्रम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । एरंडोल नगरपालिकेतर्फे प्लास्टीक पिशवी अंत्ययात्रा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी विद्यार्थी,शिक्षक,अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

शहरात संपूर्ण प्लास्टीक बंदी मोहीम सूरू असून त्याबाबत जनजागृती व्हावी, म्हणून प्लास्टीक पिशव्यांचे पार्थिव तयार करून त्यांची ट्रँक्टरवरून संपूर्ण शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी रा.ती.काबरे विद्यालय व अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी,शिक्षक,न.पा.अधिकारी व कर्मचारी यांनी प्लास्टीक पिशव्या बंदीवर घोषणा दिल्या.

सदर प्लास्टीक पिशव्यांची अंत्ययाञा नगरपालिका कार्यालयापासून सुरूवात होऊन भगवा चौक,बुधवार दरवाजा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,नागोबा मढी,अमळनेर दरवाजा,कासोदा रोड या मार्गे जलशुध्दिकरण केंद्रावर समारोप करण्यात आला.
यावेळी उपक्रमात नगराध्यक्ष रमेश परदेशी,मुख्याधिकारी विकास नवाळे,उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,नगरसेवक योगेश देवरे,कार्यालय अधीक्षक हितेश जोगी,अनिल महाजन,आर.के.पाटील आदी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी व मुख्याध्यापिका रोहीणी मानुधने आदी सहभागी झाले.

समारोप प्रसंगी जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचे संगोपन करणाऱ्या मैत्री सेवा फाउंडेशन व वृक्षप्रेमींना पर्यावरण दूत म्हणून सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -