fbpx

जिल्हा कारागृहात बंदिवान कैद्यांचे उपोषण?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । शहरातील जिल्हा कारागृहात असलेल्या पवन महाजन या बंदिवान कैद्याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी उपोषण पुकारले असल्याची माहिती समोर येत आहे.

एरंडोल पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात पवन महाजन वय-२८ हा तरुण गेल्या तीन वर्षापासून जिल्हा कारागृहात होता. पवन याला मधुमेह असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, काही दिवसापूर्वी अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री नंतर दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच कारागृह प्रशासनाविरुद्ध कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. पवन महाजन याच्या मृत्यूनंतर कारागृहातील इतर कैद्यांनी दुपारचे जेवण घेण्यास नकार दिला असून उपोषणाचा पवित्रा घेतल्याची माहिती समोर येत आहे. कारागृहातून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी जात असलेल्या एका बंदिवान कैद्याने यास दुजोरा दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज