जळगावात खड्ड्यात पाय पडल्याने करंगळीला दुखापत

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । शहरातील एका ६२ वर्षीय इसमाचा पायी फिरताना खड्ड्यात पाय पडल्याने खाली पडून त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाल्याचा प्रकार दि.६ रोजी घडला आहे.

शहरात जागोजागी खड्डे झाले असून नागरिकांना पायी फिरणे देखील अवघड होऊन बसले आहे. माया देवी नगरातील सुरेश नगरात असलेल्या मोरया पार्कमध्ये विक्रम दिवाकर पुराणिक वय-६२ हे राहतात. दि.६ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ते पायी फिरत असताना अचानक त्यांचा पाय रस्त्यावरील खड्ड्यात पडला. खड्ड्यात पडल्याने पुराणिक खाली पडले व त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली. पुराणिक यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -