मानसिक समस्यांसाठी ‘पीसीए’ राबविणार उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सायकॉलॉजिकल काउन्सेलर्स असोशिएशन (पीसीए) च्यावतीने जिल्ह्यातील काऊन्सेलर्सचे एकत्रीकरण आयोजित करण्यात आले होते. त्यात मानसिक समस्यांसाठी दर महिन्यात एक उपक्रम असोसिएशनतर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात मानसिक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून समुपदेशनाचे महत्त्व देखील जाणवू लागले आहे. कुटुंबातील अनेक व्यक्तींचे निधन, पती किंवा पत्नी वियोगामुळे एकल पालकत्व, उद्योग-व्यवसायातील आर्थिक समस्या, नोकर्‍या जाणे, वर्क फॉर्म होम, ऑनलाईन शाळा यामुळे कुटुंबातील वाद-विवाद, सात्र मुलांचे, पालकांचे प्रश्‍न, ज्येष्ठांचे वैद्यकीय व मानसिक प्रश्‍न, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींचे खचलेले मनोधैर्य अशा विविध विषयात समुपदेशकांनी मायेची फुंकर घालीत मानसिकतेचा एक भक्कम आधार स्तंभ म्हणून मोलाचे कार्य केल्याचे मत यावेळी उपस्थित समुपदेशकांनी अनुभवांची देवाण-घेवाण करतांना व्यक्त केले.

वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करतांना मानसिक आजाराच्या समस्या, वाढत्या आत्महत्या, चिंता, नैराश्य, एकटेपणा याविषयी असोसिएशनतर्फे दर महिन्यात एक उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकत्रीकरणास कार्याध्यक्ष धनंजय जकातदार, मानद सचिव डॉ. प्रतिभा हरणखेडकर, कोषाध्यक्ष डॉ. अपर्णा मकासरे, सुधीर वाघुळदे, प्रा.डॉ. विवेक काटदरे, आनंद जाधव, वृषाली व्यवहारे, शरद सावळकर, चंचल रत्नपारखी, पियाली पुरोहित, नितीन विसपुते, लिना जैन, ऋषीकेश शिंपी, माया काळे, किशोर राजे, डॉ. प्रभु व्यास आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज