तुरीच्या शेंगांवर अळ्यांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । यंदा अतिपावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तुरीवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. शेंगा पोखरणारी अळी, पतंग व शेंगमाशी आदी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तुरीवरील अळीचा व रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी एच.एन.पी.व्ही.जैविक किड नियंत्रणाचा वापर करावा. फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा हेलिओकील ५०० मिलि हे गरजेनुसार वापरावे. तिसरी फवारणी स्पीनोसॅड ४५ एसी प्रवाही २०० मिली प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे. त्यामुळेे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट हाेईल. असे आवाहन कृषी विभाकडून करण्यात आले आहे.

कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी

चाळीसगाव तालुक्यात ४५० हेक्टरवर तुरीची लागवड झाली असून, अळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. ढगाळ वातावरण व थंडीचाही परिणाम झाला असून, यंदा अतिपाऊस झाल्याने उत्पादनही मोठ्याप्रमाणात हाेणार आहे. मात्र, शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे त्यात घट हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुरीवरील अळीचा नायनाट करण्यासाठी एकरी एक ते दोन हजार रुपये जादा खर्च करावा लागत आहे. हा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसून, आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सध्या तूर फुलावर शेंगा तयार होत आहेत. तुरीचे उत्पन्न चांगले येईल. या आशेवर असताना घाटेअळी, पासारा, पतंग, शेंगमाशी यामुळे उत्पादनात २० ते ३० टक्के घट होणार आहे. तुरीचे कोवळे देठ असल्यामुळे त्यामधील शेंगांना छिद्र पाडून या अळ्या आतील दाणे खात असल्यानेे शेतकरी चिंतेत आहेत.

जैविक कीड नियंत्रणाचा वापर करा 

तुरीवरील अळीचा व रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी एच.एन.पी.व्ही.जैविक किड नियंत्रणाचा वापर करावा. फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा हेलिओकील ५०० मिलि हे गरजेनुसार वापरावे. तिसरी फवारणी स्पीनोसॅड ४५ एसी प्रवाही २०० मिली प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे. त्यामुळेे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा नायनाट हाेईल. असे आव्हान
रमेश सांगळे, कृषी सहाय्यक. कृषी विभाग चाळीसगाव. यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज