fbpx

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । करोनाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठू लागल्याने राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसंच आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उद्या मंत्रिमंडळाची बैठक अपेक्षित असून यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कॅबिनेटच्या सदस्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल. लॉकडाउन किंवा ब्रेक दी चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेतले जाऊ शकतात,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

तसेच लगेच पूर्ण लॉकडाउन हटवला जाईल अशी अपेक्षा करु नका म्हटलं आहे. सगळं लगेच १०० टक्के कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल. परंतु पूर्ण लॉकडाउन काढून १०० टक्के मोकळीक होईल असं होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

राज्यात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्हे सध्या संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज