fbpx

भारतीय डाक विभागांतर्गत नोकरीसंधी ; जळगाव जिल्ह्यातील दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना संधी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ ।  भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा योजनेसाठी पॉलसी एजेटंची थेट भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी दहावी व बारावी पास झालेले 18 ते 60 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. या उमेदवारांची निवड ही मुलाखत पध्दतीने होणार असून त्यासाठी दिनांक 23 जुलै, 2021 पर्यंत डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव या पत्यावर अर्ज रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवावेत. 

अर्जाचा नमुना हा डाक अधिक्षक कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी अर्जाचा नमुना प्राप्त करण्यासाठी डाक अधिक्षक कार्यालय, पांडे चौक, हेड पोस्ट ऑफीस, जळगाव येथे संपर्क साधावा. किंवा विकास अधिकारी हेमंत ठाकुर यांचेशी मोबाईल क्रमांक 9890893153 वर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. बी. एच. नागरगोजे, अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज