⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

१०वी पास उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची संधी ; ६९ हजार रुपयांपर्यंत पगार

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास तरुणांना एक संधी चालून आली आहे. भारतीय नौदलातर्फे ऑक्टोबर २०२१ बॅचमध्ये संगीतकार नाविक पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार २ ऑगस्ट २०२१ पासून यासाठी अर्ज करता येणार आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून भारतीय नौदलात एकूण ३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे.

पदाचे नाव: सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) – ०२/२०२१ बॅच

शैक्षणिक पात्रता:  (i) १० वी उत्तीर्ण  (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

वयोमर्यादा :  १ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यानचा असणे गरजेचे आहे.

मानधन PayScale :
ट्रेनिंग दरम्यान उमेदवाराला १४ हजार ६०० रुपये स्टायपेंड दिला जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिफेन्स पे मॅट्रीक्स लेवल-३ अंतर्गत २१ हजार ७०० रुपयांपासून ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. याशिवाय त्यांना एमएसपीच्या माध्यमातून ५ हजार २०० प्रति महिना प्लस डीए दिला जाईल.

शारीरिक पात्रता:
भारतीय नौदलात एमआर संगीतकार नाविकसाठी फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) देखील घेतली जाणार आहे. पीएफटीममध्ये ७ मिनिटात १.६ किलोमीटर धावावे लागणार आहे. यासोबतच १० पुशअपचा समावेश असेल. साधारण ३०० उमेदवारांना म्यूझिक टेस्ट आणि पीएफटीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क : ६० रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2021 

प्रवेशपत्र: सप्टेंबर 2021

परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

जाहिरात Notification : PDF