fbpx

भारतीय हवाई दलात बारावी ते पदवी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; ५६ हजारापर्यंतचा मिळणार पगार

mi-advt

कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरुणांसाठी इंडियन एअर फोर्स म्हणजेच भारतीय हवाई दलात नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलात एकूण 357 पदांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून आहे. पात्र उमेदवार ऑफिशियल वेबसाईट afcat.cdac.in वर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.

या पदांसाठी होणार भरती?

१) एएफसीएटी साठी 96 पदे,

२) ग्राऊंड ड्यूटी टेक्निकल साठी 107 पदे,

३) ग्राऊंड ड्यूटी नॉन टेक्निकल 96 पदं,

४) मेट्रोलॉजी -28

इतर पदांसाठी एनसीसी स्पेशल एन्ट्री असेल. इंडियन एअर फोर्सच्या या भरती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता :

फ्लाइंग ब्रांच साठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित आणि भौतिकशास्त्रातून पदवी उत्तीर्ण झालेले असावेत. ग्राऊंड ड्यूटी साठी 12वी पास अर्ज सादर करु शकतात. ग्राऊंड बीपी नॉन टेक्निकल लॉजिस्टिक साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करु शकतात. अकाऊंट विभागातील पदासाठी अर्ज करण्यासाठी वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. एनसीसी स्पेशल एन्ट्रीमध्ये अर्ज करण्यासाठी एनसीसी एयर विंग सीनियर डिवीजन ‘सी’ सर्टिफिकेट असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

परीक्षा फी : २५०/-

वयोमर्यादा : २० ते २६ वर्षे

अर्ज कुठे दाखल करायचा

इंडियन एअर फोर्सच्या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणारे उमेदवार ऑफिशियल वेबसाईट afcat.cdac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.

निवड प्रक्रिया :

– एएफसीएटी लेखी परीक्षा

-अधिकारी बुद्धिमत्ता रेटिंग चाचणी आणि चित्र धारणा आणि चर्चा चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी

– गट चाचण्या / मुलाखत.

जाहिरात Notification : PDF

ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा

 

 

सूचना : जळगाव लाईव्हच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या रोजगार विषय जाहिरातींची संबधित संस्था, विभाग, कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज