fbpx

Air Force भारतीय वायुदलात दहावी ते पदवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

mi-advt

जर तुम्हाला भारतीय वायुदलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.  वायुदलात विविध एकूण १७४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एअर फोर्स ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अॅप्लिकेशन फॉरमॅटनुसार आपला अर्ज कागदपत्रांसह जमा करायचा आहे.

जागांचा तपशील –

१) स्टोर सुप्रींटेंडेंट – ३ पदे

२) लोवर डिविजन क्लर्क (एलडीसी) – १० पदे

३) स्टोर कीपर – ६ पदे

४) कुक (ऑर्डिनरी ग्रेड) – २३ पदे

५) पेंटर (स्किल्ड) – २ पदे

६) कारपेंटर (स्किल्ड) – ३ पदे

७) हाउस किपिंग स्टाफ (एचकेएस) – २३ पदे

८) मेस स्टाफ – १ पद

९) मल्टी टास्किंग स्टाफ – १०३ पदे

पात्रता : 

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी किंवा १२ वी तसेच पदवी (पदांनुसार विविध) असणे अनिवार्य आहे. सोबतच ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्यानुसार संबंधित ट्रेडमधील सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा :

उमेदवारांचे वय अर्जाच्या अखेरच्या मुदतीदिवशी किमान १८ आणि कमाल २५ वर्षे असायला हवे. एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि अन्य प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार सवलतही मिळेल. अधिक माहितीसाठी या भरतीची जाहिरात पाहावी.

असा करा अर्ज :

एअर फोर्स ग्रुप सी भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अॅप्लिकेशन फॉरमॅटनुसार आपला अर्ज कागदपत्रांसह जमा करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत हा अर्ज उमेदवारांनी जेथील जागांसाठी अर्ज केला आहे, त्या एयर फोर्स स्टेशनमध्ये जमा करायचा आहे.

जाहिरात Notification : PDF

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज