fbpx

जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांच्या वेळेत वाढ ; आता इतक्या वाजेपर्यंत राहणार सुरु

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आले असून त्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार तास सुरु राहणार आहे. मात्र, सध्या निर्बंध काळात गरजूंना वाटप करण्यात येणाऱ्या धान्याच्या वेळेत व सर्व लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा २ तासांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.आहे. याविषयी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले असून, त्यानुसार आता स्वस्त धान्य दुकाने सकाळी सात ते दुपारी एक यावेळेत उघडी राहणार आहेत.

स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास व दुपारी चार तास उघडी ठेवावीत, असे आदेश आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग पाहता त्यामध्ये बदल करण्यात येऊन सकाळी सात ते अकरा यावेळेत ही दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते.

कोरोनाचा संसर्ग पाहता गर्दी होऊ नये तसेच निर्बंधादरम्यान गरजूंना धान्याचे पूर्णपणे वाटप व्हावे, यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे.  ३१ मेपर्यंत नियमित धान्य वाटपासह प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्याचेदेखील पूर्णपणे वाटप करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मे २०२१साठी लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता, स्वस्त धान्य दुकानदारांना स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉसद्वारे धान्य वितरीत करण्याची विशेष मुभा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र, या सवलतीचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज