ब्राऊन शुगरप्रकरणी महिलेसह संशयिताच्या कोठडीत वाढ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । रावेरात कोट्यवधींचे किमत असलेले ब्राऊन शुगर जप्त करण्यात आल्याच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी पकडलेला संशयीत सलीम खान हा तपासात सहकार्य करीत नसल्याने, त्याच्या पाेलिस काेठडीत वाढ करावी, अशी मागणी तपासाधिकाऱ्यांनी शुक्रवारी न्यायालयात केली. त्यामुळे जळगाव न्यायालयाने दोन्ही संशयितांच्या पाेलिस काेठडीत २ दिवसांची वाढ केली.

स्थानिक गुन्हे शाखेसह रावेर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत रावेर शहरातून, ११ डिसेंबरा कोट्यवधींचे अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त केले होते. या प्रकरणी अख्तरी बानो अब्दुल रऊफ तर नंतर संशयीत सलीम खान शेरबहादूर खान यालाही अटक केली. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जळगाव विशेष न्यायालयात न्यायाधीश एम. बी. बोहरा यांच्यासमाेर हजर केले. न्यायालयाने त्यांची कोठडी २७ पर्यंत वाढवली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -