फळ पीक विमा योजनेत यावलचा समावेश करा : खा.रक्षा खडसे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । फळ पिक विमा योजने संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी फळ पीक विमा योजनेत यावलचा समावेश करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सन २०२१-२२ च्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतुन जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यास वगळण्यात आलेली असुन, याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांना अनेक शेतकऱ्यांच्या दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष तक्रारी येत होत्या, याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बठक आयोजित करणे बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना कळविण्यात आले होते.

हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतुन वगळल्यामुळे यावल तालुक्यातील शेतकरी नाराज होते त्यांचा शासनावर मोठा रोष दिसून येत होता. यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिक घेतले जात असते, परंतु कृषी विभागाकडून सन २०२१-२२ च्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतुन यावल तालुक्याला वगळण्यात आलेले होते यासंदर्भात ११ रोजी खासदार रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यास सहभागी करणेसाठी तत्काळ कार्यवाही होणे, स्वंयचलित हमामान यंत्राचे गावातील ठिकाण बदलवुन शेतात लावणे, तसेच फळ पिक विमा योजने बाबत शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी आहेत त्यासोडविणेसाठी विमा कंपनी प्रतिनिधींनी १ महिन्यापर्यंत तालुका कृषी कार्यालय येथे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे बाबत जिल्हाधिकारी यांना करण्याच्या सुचना केल्या.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, यावल तालुका कृषी अधिक्षक भामरे, किनगांव मंडळ अधिकारी खैरनार यांच्यासह कृषी विभाग अधिकारी, विमा कंपनी बजाज अलायन्स प्रतिनिधी व यावल तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -