रमाई घरकुल योजनेत अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थीचे नाव समाविष्ट करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेच्या ” ड ” यादीतून  अनुसूचित जाती व जमातीच्या काही लाभार्थींना डावलण्यात आले आहे.त्यामुळे याची चौकशी होऊन त्यांना ” ड” यादीत समाविष्ट करण्याची मागणी रिपाई आठवले गटाच्यावतीने एरंडोल पंचायत समिती विस्तार अधिकारी सपकाळे व चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, गृप ग्रामपंचायत यांनी प्रधानमंत्री आवास योजना – रमाई घरकुल योजना एकूण पात्र लाभार्थी यादीत एकूण १९० लाभार्थी यादी तयार केलेली असताना मात्र आपल्याकडेस एकूण लाभार्थी १४४ यादी आपल्या कार्यलयात दाखल केलेले आहे. दाखल केलेल्या ” ड ” यादीत अनुसूचित जाती व जमाती च्या लाभार्थींना डावलण्यात आलेले आहे.अनुसूचित जातीचे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, अनुसूचित जातीचे गरजू लाभार्थीवर अन्याय होऊ नये, यासाठी चौकशी होऊन त्यांना ” ड” यादीत समाविष्ट करावे.अन्यथा नाईलाजाने आपल्या कार्यलयासमोर आदोलंन छेडण्यात येईल.आणि होणाऱ्या परिणामास संबंधित जबाबदार राहतील याची कृपया याची नोंद घ्यावी.असे निवेदन म्हटले आहे.

यावेळी रिपाई एरंडोल तालुकाध्यक्ष तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य प्रविण बाविस्कर, तालुका सचिव तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य देवानंद बेहेरे, तालुका सल्लागार सिताराम मराठे, गजानन पाटील, मजित बेलदार, युवराज बेहेरे, रमेश बेहेरे, भिला गायकवाड, भूषण बेहेरे, संजय बेहेरे व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -