सर्व भेद विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास शक्य -ना.गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । जर विकासाची गोष्ट डोक्यामध्ये ठेवली तर गावाचा विकास  शक्य असून  सर्वांनी एकत्र येऊन  गावाच्या राजकारणात आजी-माजी सदस्य , सरपंच व उपसरपंच यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री पेयजल योजना अमलात आणली . तसेच १४ व्या वित्त आयोग अंतर्गत व्यापारी गाळे बांधकाम सुद्धा पूर्ण केले.असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या पाड्या वर, वाड्यावर , छोट्या छोट्या गावात सुद्धा पिण्याचे पाणी पोहोचले पाहिजे हा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे.

ते न्हावी ग्रामपंचायत  द्वारा आयोजित मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व १४ वित्त आयोग अंतर्गत व्यापारी  गाळे बांधकाम उद्घाटनाच्या व्यासपीठावरून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि प अध्यक्षा  ना.रंजनाताई पाटील, आ. सुरेश भोळे, आ संजय  सावकारे, माजी आ.अरुण पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, जि प सदस्य प्रभाकर सोनवणे, पं स सभापती पल्लवीताई चौधरी, यावल कृउबा सभापती तुषार  पाटील, खरेदी-विक्री संघाचे सभापती सुनील फिरके ,कृषीभूषण नारायण चौधरी, माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, पं स सदस्य सरफराज तडवी, टी एम ई एस सोसायटीचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलक, माजी जि प सदस्या आरती महाजन ,उमेश फेगडे, विलास चौधरी, जि प सदस्या सविता भालेराव, पुरुजीत चौधरी, पं स माजी सभापती निर्मला फिरके, उपसभापती योगेश भंगाळे, नगरसेवक परिक्षित ब-हाटे उपस्थित होते.

सर्वप्रथम संत गाडगेबाबा व कै.दादासाहेब  जे टी महाजन यांना ९७ व्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . प्रास्ताविकात गावाच्या सरपंच भारती चौधरी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून गावाच्या विकास कामांबद्दल  थोडक्यात माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.व्यासपीठावरील सर्व मान्यवर पाहुण्यांचा सत्कार ग्रामपंचायत प्रशासनाकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

मनोगतातून शरद महाजन यांनी गावाच्या विकासाबद्दल माहिती सांगून दादासाहेब कै.जे टी महाजन ( माजी गृहराज्यमंत्री ) यांनी जनतेचे  काम करण्याचा जो वसा दिला आहे तो वसा निष्ठेने व प्रामाणिकपणे पुढे नेत असल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्रामपंचायत प्रशासन करीत असते आणि ग्रामस्थांकडून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो.मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या गंगेमध्ये सगळेच एकत्रितपणे काम करीत आहेत.असे गौरवोद्गार ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल काढले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार गिरीश महाजन म्हणाले ,स्पर्धा कशी करायची तर  विकासाची स्पर्धा असावी. विकासासाठी सर्व एकत्र आले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.विकास करताना राजकारण विरहित विकास केला पाहिजे .प्रत्येकाने श्रेय वादाच्या भानगडीत पडू नये.या परिसरातील शेतकरी आणि कर्मचारी यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाहेर काढून एकत्रित आले तर कारखाना सुरू होऊ शकतो.यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आ.संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, माजी आ. अरुण पाटील यांनी आपले मनोगतातून ग्रामपंचायतीच्या  कार्याचे कौतुक केले. वामन नेहेते या शेतकऱ्याने व्यासपीठा जवळ जाऊन शेतातील विज आठ तास असते ती बारा तास मिळावी अशी मागणी केली. सौ शितल विनोद तायडे या महिलेला जि प अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बेबी केअर  किटचे वाटप करण्यात आले. बाल विकास प्रवेशिका के पी तायडे यांचा सरपंच भारती चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरोग्यसेविका पल्लवी भारंबे यांचाही सभापती पल्लवी चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच भारती चौधरी ,उपसरपंच उमेश बेंडाळे, ग्रा पं सदस्य देवेंद्र चोपडे, सोनल महाजन ,यशवंत तळेले, प्रतिभा झोपे, आलिशान तडवी, रवींद्र तायडे ,भारती इंगळे, गायत्री वाघुळदे, योगीता तळेले, जावेद तडवी, जोहरा बी पिंजारी, मनीषा सुरवाडे ,ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर जयकांर व माजी उपसरपंच नितीन चौधरी यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.के जी पाटील यांनी तर आभार उपसरपंच उमेश बेंडाळे यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar