fbpx

कोविड रुग्णांसाठी तळागाळात आजही काँग्रेस कार्य करीत असल्‍याचा आनंद : आ.प्रणिती शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । गेल्‍या वर्षभरात डॉ.उल्‍हास पाटील कोविड रुग्णालयाच्‍या माध्यमातून काँग्रेस पदाधिकारी देत असलेल्‍या सेवेचा आढावा व एमडीएल लॅब आणि ऑक्‍सीजन टँकची उपलब्धता यातून तळागाळात आजही काँग्रेस आपली कार्य करण्याची संस्‍कृती जोपासल्‍याचा आनंद होत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले.

महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्‍या कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार प्रणितीताई सुशिलकुमार शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते आज 15 मे रोजी डॉ.उल्‍हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एनएबीएल मानांकित एमडीएल लॅबसह 13 किलोलिटर क्षमतेच्‍या दोन ऑक्‍सीजन टँकचे लोकार्पण करण्यात आले, याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. तत्‍पूर्वी आ.प्रणितीताई शिंदेचे जोरदार स्‍वागत करण्यात आले. आमदार प्रणितीताई शिंदे ह्या जळगाव जिल्‍ह्यातील काँग्रेस कार्यकत्‍यांच्‍या भेटीसाठी आल्‍या होत्‍या, या भेटीगाठीनंतर त्‍यांनी कोविड काळात अविरतपणे सेवा देत असलेल्‍या डॉ.उल्‍हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली, दरम्‍यान आपल्‍या या भेटीत नर्सेस आणि कोविड रुग्णालय काम करणारे डॉक्‍टरांचे कौतुक केले.

तसेच त्‍यांच्‍या हस्‍ते एमडीएल लॅबसह ऑक्‍सीजन टँकचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी हे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष ॲड.संदिपभैय्या पाटील, माजी जिल्‍हाध्यक्ष उदय पाटील, जिल्‍हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, महिला अध्यक्ष सुलोचनाताई वाघ, डॉ.केतकीताई पाटील, धनंजय शिरीष चौधरी, उत्‍तर महाराष्‍ट्रचे बंटीभैय्या ह्यांची उपस्‍थीती लाभली. कोविड-19 च्‍या नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. प्रास्‍ताविकात माजी खासदार डॉ.उल्‍हास पाटील यांनी ऑक्‍सीजन टँक आणि एमडीएल लॅब तसेच कोविड रुग्णालयातील कार्याचा धावता आढावा घेतला.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानावरुन बोलतांना आमदार शिरीष मधुकरराव चौधरी म्‍हणाले की, वयाने आणि अनुभवाने मोठे झाल्‍यापेक्षा आलेल्‍या प्रसंगाला सामोरे कसे जाता येते यावरुन नेतृत्‍व प्रस्‍थापित होते तसेच कोरानातून बरे करण्याचे काम डॉ.उल्‍हास पाटील रुग्णालय अविरतपणे करत असून आगामी तिसऱ्या लाटेसाठीही रुग्णालयाने सज्‍ज राहावे, असे आवाहन आ.चौधरी यांनी केले. याप्रसंगी आ.प्रणितीताई शिंदे म्‍हणाल्‍या की, जळगाव जिल्‍हावासियांसाठी डॉ.उल्‍हास पाटील कोविड आणि नॉन कोविड रुग्णालय हे 24 तास सेवेत असल्‍याने रुग्णांना वेळीच उपचार मिळत आहे, सोबतच कोविडचा संसर्ग ओळखण्यासाठी आवश्यक असलेली आरटीपीसीआर लॅब अर्थातच एमडीएल लॅब ही कार्यान्वित असून 24 तासातच रिपोर्ट देण्यात येत असल्‍याने ही बाब खुपच उल्‍लेखनीय आहे, तसेच राज्‍यात ऑक्‍सीजनअभावी रुग्णांचा मृत्‍यू होत असल्‍याचे चित्र दिसत आहे मात्र येथे डॉ.उल्‍हास पाटील यांच्‍या दूरदृष्‍टीने तयार झालेले 13 किलोलिटरच्‍या दोन ऑक्‍सीजन प्लान्ट हे खरोखरच रुग्णांसाठी संजीवनीच ठरत असल्‍याचे गौरवोद्गार आमदार प्रणितीताई शिंदे ह्यांनी काढले.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे सदस्‍य डॉ.वैभव पाटील, महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, डॉ.प्रशांत वारके, एन.जी.चौधरी, प्रविण कोल्‍हे आदिंसह जिल्‍ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्‍थीत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज