fbpx

चाळीसगाव येथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुलात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उदघाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या वैद्यकीय सहाय्यता कक्षात रुग्णांना दाखल करून घेणे, रुग्णवाहिका, लसीकरण, रक्तसाठा व सोयी सुविधांबाबत रुग्णांना माहिती दिली जाणार आहे.

त्यासाठी हिंगोणेसिम येथील रहिवासी व गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथे चाळीसगाव तालुक्यातील रूग्णांना मदत करणारे किशोर पाटील (संपर्क क्रमांक 9975952698 ) हे सेवा देणार आहेत.

सदर वैद्यकीय सहाय्यता कक्ष उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजयाताई पवार, यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे नेते नगरसेवक आनंद खरात, बापू अहिरे, जितेंद्र वाघ, अमोल चव्हाण, बबन पवार, अमोल चौधरी, रोहन सूर्यवंशी, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

आपण बिनधास्त राहिलो म्हणून दुसऱ्या लाटेचा मनस्ताप सहन करावा लागला, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज होऊया. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असण्याची शक्यता लक्षात घेता चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर येथे लहान मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचा दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक साधनसामग्री माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt