⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनी महाविद्यालयात ‘ड्रामा क्लब’चे उद्घाटन

रायसोनी महाविद्यालयात ‘ड्रामा क्लब’चे उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । आजच्या काळात अभिनयाचे तांत्रिक शिक्षण घेऊनच सिने-नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा मानस बरेच तरुण व्यक्त करताना दिसतात. अशा तरुण पिढीच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावा यासाठी रायसोनी महाविध्यालायात ‘ड्रामा क्लब’ स्थापन करण्यात आला असून महाविध्यालयाच्या प्रांगणात या क्लबचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच ड्रामा क्लबचे समन्वयक व जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील उपस्थित होते.

रायसोनी इस्टीट्युट नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग सादर करीत आली आहे. नाट्यविषयक उपक्रम राबवत आली आहे. भारतभर संस्थेने स्वत:चा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. संस्थेच्या वाटचालीत आता नवा टप्पा सुरू होतोय असे मत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी उद्घाटन कार्यक्रमाला व्यक्त केले. तसेच ड्रामा क्लबचे बापूसाहेब पाटील यांनी यावेळी म्हटले कि नाटकाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन या क्लबमध्ये केले जाणार असून तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण अभ्यासक्रम विकसित केला गेला आहे. सगळ्यांनाच मुंबई पुण्यात जाऊन नाटकाचे शास्त्रीय शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थी मित्रांना या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले व क्लबच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह