पवि.पाटील व एटी.झांबरे विद्यालयात नृत्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात नृत्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यात लोकनृत्य, वेस्टर्न डान्स, सोलो डान्स, समूह नृत्य असे विविध नृत्य प्रकार शिकवले जाणार आहे. याचे केसीई विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रसंगी केसीई सोसायटीच्या नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण केले. यावेळी केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, केसीई नृत्य विभाग प्रमुख अजय शिंदे, मुख्या.रेखा पाटील, मुख्या.दिलीपकुमार चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले तर आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -