fbpx

यावल तालुक्यात शौचालयात खादाड सामुदायिक रित्या घेताहेत टक्केवारीचा स्वाद

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । सुरेश पाटील। यावल तालुक्यात शौचालयात खादाड सामुदायिक रित्या  टक्केवारीचा स्वाद घेत असल्याने जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाही न केल्यास भ्र.वि.जन आंदोलन न्यास,जनसंसद समिती आणि आरपीआय आंदोलन करणार आहेत.

ग्रामीण भागात स्वच्छता अभियान यशस्वी होण्याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे परंतु यावल तालुक्यात शौचालय बांधकाम करताना संबंधित ठेकेदाराकडून संबंधित यंत्रणा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ठेकेदारांकडून वाजवीपेक्षा जास्त टक्केवारी/लाच घेत असल्याने शौचालयाचे बांधकामे अत्यंत निकृष्ट प्रतीची आणि अपूर्ण अवस्थेत करून ती कामे पूर्ण दाखवून ठेकेदारांना बिले अदा करण्यात येत आहेत.यावल तालुक्यात शौचालयांची जी बांधकामे सुरू आहेत आणि झालेली आहेत ती बांधकामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे चांगल्या प्रतीच्या बांधकाम साहित्यातच करण्यात आलेली आहे किंवा नाही याची चौकशी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी,ग्राम विस्तार अधिकारी,यावल पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंता यांच्यासह संबंधित ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य का करीत नाहीत? यांचे आणि ठेकेदाराचे काही हितसंबंध आहेत का?याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावल तालुक्यातील शौचालयाच्या कामासह इतर सर्व कामांची चौकशी करणेसाठी एक समिती नियुक्त करून झालेली कामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणेच झालेली आहेत किंवा नाही याची चौकशी करून दोषीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जन संसद समिती जळगाव जिल्हा अध्यक्ष,तथा आदरणीय अण्णा हजारे कृत भ्र.वि.जन आंदोलन न्यास आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवा जिल्हा कार्याध्यक्ष अशोकभाई तायडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज