स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील कळमडु येथे भीमाशंकर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय या सोहळ्यामध्ये पंचकुंडात्मक रुद्र स्वाहाकार यज्ञ सोहळा अखंड नंदादीप असे अनेक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाचे आयोजक जय बाबाजी भक्त परिवार व ग्रामस्थ मंडळ कळमडु होते. या कार्यक्रमासाठी मुर्ती दाते श्री हिम्मतराव देवराम सोनवणे व श्री बापूराव हिम्मतराव सोनवणे हे होते. या कार्यक्रमासाठी महाप्रसाद दाते महादू रतन निकम व वैभव परशुराम निकम यांनी महाप्रसाद पंगतीला वाटा घेतला. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक आणि नंतर सत्संग सोहळा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी चाळीसगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar