fbpx

अतिक्रमण काढण्यासाठी मनपातील अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जळगाव शहरातील सहा रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा कारवाईला मनपाकडून सुरुवात करण्यात आली आहे. कानळदा रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले आहे. मात्र इच्छा देवी चौक ते डी मार्च पर्यंत रस्तावरील व असोदा रस्त्यावरील झोपडपट्टी बाबद लवकरच निर्णय होणार आहे.  इच्छा देवी चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी मनपातील अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

सहा रस्त्यांवरील नवीन कामांसाठी बांधकाम विभागाने तीन दिवसांत अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी कानडा रस्त्यावर अतिक्रमण काढण्यात आले आहे. निमखेडी रस्त्यावर अतिक्रमण नसल्याने या रस्त्यावर कारवाई करण्याची गरज नाही. असे मनपाने सांगितले आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज