चाळीसगावात अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये रोकड लांबवली; गुन्हा दाखल 

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ ।  चाळीसगाव येथे एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना रविवार रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी राजेंद्र शंकरराव वाघ यांच्या  फिर्यादीवरून येथील शहर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ जय शंकर रेडीमेड ही कापड दुकान आहे. या दुकानात ठेवलेले १ लाख रुपये रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवार रोजी सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना शनिवारच्या रात्री १० वाजेपासून तर रविवार रोजी सकाळी ९:३० वाजेदरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. राजेंद्र शंकरराव वाघ रा. शनिमंदिर चाळीसगाव याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज