भुसावळात वृद्ध महिलेच्या पर्सला ब्लेड मारून 20 हजार लांबवले

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ बाजारपेठेत दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या ललिता सपकाळे या वृद्ध महिलेच्या पर्सला ब्लेड मारून 20 हजारांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवार, 29 रोजी घडली. याप्रकाराणी वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, वरणगाव येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी बबन रघुनाथ सपकाळे हे शुक्रवारी पत्नी ललिता सपकाळे यांच्या सोबत दिवाळीच्या खरेदीसाठी भुसावळात आले होते. दुपारी तीन वाजता भुसावळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथून त्यांनी 20 हजार 500 रुपये विड्रॉल करत पैसे पर्समध्ये ठेवून ते बाजारात गेले असता ललिता सपकाळे यांच्या पर्सला स्टेट बँक ते मरीमाता मंदिरादरम्यान अज्ञात चोरट्याने ब्लेड मारत 20 हजारांची रोकड लांबवली. मरीमाता मंदिराजवळ रांगोळी खरेदीचे पैसे देत असताना पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले.

सपकाळे दाम्पत्याने बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरुध्द्व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज