fbpx

१ जुलैपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । दोन दिवसानंतर जून संपून जुलै महिना सुरु होणार आहे.  १ जुलैपासून तुमच्या जीवनाशी संबंधीत काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सामान्यांच्या जीवनावर होणार आहे.

वास्तविक दर महिन्याच्या १ तारखेला सिलेंडरच्या किंमतीत बदल होतो. पुढील महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिलेंडर घेण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे गृहिणींची बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

ऑईल कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. १ जुलैपासून ऑईल कंपनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करतील असं बोललं जात आहे. मात्र ही वाढ करणार की दरात घट करणार? हे आपल्याला १ जुलै रोजी कळणार आहे.

SBI एटीएममधून पैसे काढण्याबाबत काही नियम बदलणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेव्हिंग अकाऊंटमधून प्रत्येक महिन्याला ४ वेळा ट्रांजेक्शन मोफत केले जाऊ शकतात. ज्यात एटीएम आणि बँक खात्याचा समावेश आहे. मात्र मोफत व्यवहारानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनवर चार्ज आकारला जाणार आहे.

एसबीआयच्या मोफत ट्रांजेक्शननंतर प्रत्येक ट्रांजेक्शनवर अतिरिक्त १५ रुपये आणि जीएसटी शुल्क बँकेकडून आकारला जाणार आहे. रोख रक्कम बँकेतून काढण्यावरील शुल्क होम ब्रांच, एटीएम आणि नॉन एसबीआय एटीएमवर लागू होणार आहे

SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट खातेधारकाला आर्थिक वर्षात १० पानांचे चेकबुक मिळेल. त्यासाठी बँक तुमच्याकडून ४० रुपये आणि जीएसटी वसूल करेल. २५ पानांच्या चेकबुकसाठी ७५ रुपये, तातडीनं १० पानांच्या चेकबुकसाठी ५० रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक खातेधारकांना चेकबुकच्या नव्या नियमांमध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कात सूट मिळेल

जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर लवकर भरा अन्यथा तुम्हाला १ जुलैपासून दुप्पट टीडीएस भरावा लागेल. परंतु याच कारणामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची तुम्हाला संधी दिली आहे. आईटीआर फाईल करण्याची मुदत ३१ जुलै अखेर असते परंतु ती ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

कॅनरा बँक १ जुलैपासून सिंडिकेट बँकेचे IFSC कोड बदलणार आहे. त्यामुळे सिडिंकेट बँक खातेधारकांना अपडेट IFSC कोडसाठी बँकेत जावं लागेल. जर बँकेच्या ग्राहकांनी IFSC कोड अपडेट केला नाही तर १ जुलैपासून NEFT, RTGS, IMPS सारख्या सुविधांचा लाभ घेता येणार नाही

१ जुलैपासून वाहन चालक परवान्यात बदल होणार आहे. आता ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण कोणत्याही मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण आणि आवश्यक अटींचे पालन केल्यानंतर तुम्हाला लायसेन्स मिळू शकते.

कोरोना काळात बँक खात्यात किमान बँलेन्स ठेवण्याचा नियम शिथिल करण्यात आला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत हा आदेश लागू होता. ३० जूनला या आदेशाचा कालावधी संपल्याने १ जुलैपासून जर तुमच्या खात्यात किमान बॅलेन्स नसल्यास बँक अतिरिक्त शुल्क आकारू शकते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt