जळगावकरांनो खबरदार.. आजपासून नवीन वाहन कायद्याची अंमलबजावणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । अपघाताच्या (Accident) वाढत्या घटना व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्राने मोटार वाहतूक कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात नवीन मोटार वाहन कायदा २०१९ (New Motor Vehicle Act 2019) ची अंमलबजावणी आजपासून (दि. १३) सुरू होत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनचालकांना आणखी महागात पडणार आहे.

यात महत्त्वाचे म्हणजे आता हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्याचा परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित होऊ शकतो. तसेच प्रवासी वाहनांमध्ये १२ वर्षांखालील बालकांना पुरेशी बैठक व्यवस्था देणे सक्तीचे केले आहे. यासह वाहतूक सुरक्षेचे अनेक नियम कठोर करण्यात आले आहे.

देशात आणि राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याला एकमेव कारण म्हणजे वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. तसेच अल्पवयीन मुलेसुद्धा वाहने चालवताना निदर्शनास आले. विना परवाना, विना नंबर प्लेट, भरधाव व विना हेल्मेट, वाहन चालविण्याचे प्रकार वाढत आहेत.

माञ, दंडाची रक्कम कमी असल्यामुळे नियम मोडले तरी रक्कम भरून वाहनचालक सुटका करून घेत होते. त्यामुळे घाताच्या वाढत्या घटना व वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्राने मोटार वाहतूक कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कायद्यात सुधारणा करून दंडाच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. याबाबतची अंमलबजावणीही देखील सुरू झाली आहे.

५० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतचे दंड निर्धारित करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडे असलेल्या अॉनलाइन दंडाच्या मशीनमध्ये सर्व नियम व दंड अपडेट करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून वाहन चालवताना नियमांचे पालन करणे सक्तीचे केले आहे. पहिला दंड भरल्यानंतर पुन्हा तीच चूक करणाऱ्यास दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रक वाहतूक शाखेने काढले.

नवीन नियम लागू
वाहतुकीचे नवीन नियम राज्यभरात लागू करण्यात आले आहेत. त्या अनुशंगाने सोमवापासून जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. वाहनचालक, मालकांनी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडे असलेल्या मशीनमध्ये नवीन नियमांनुसार कायद्याचे उल्लंघन व दंडाची रक्कम सेट करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -