अलर्ट : जिल्ह्यासाठी पुढील ४ तास महत्वाचे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । आयएमडी मुंबईने जळगाव जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला असून पुढील ४ तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात रात्री बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. आयएमडी मुंबईच्या हवामान खात्याने सकाळी ७ वाजता अलर्ट जारी केला आहे. पुढील ४ तासात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -