अवैध वाळू वाहतूक, ६० हजारांची तोडपानी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक सर्वांना ज्ञात आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर ६० हजारांची तोडपानी करून दिल्याची चर्चा आहे.

गिरणा पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळू अवैधरित्या उपसा करून वाहून नेली जाते. शासनाचे नियम दिवसेंदिवस कठोर होत असले तरी भ्रष्टाचार सुरू असल्याने वाळू चोरीचे प्रकार सुरूच आहे. बुधवारी सावखेडा शिवारात आर्यन पार्क जवळ महसुलच्या ३ अधिकाऱ्यांनी ३ ट्रॅक्टर अडविले. तिघांना विचारपूस केली असता दोघांनी धूम ठोकली. पथकाने अडविलेल्या एकाकडून ६० हजारांची चिरीमिरी करून ट्रॅक्टर सोडून दिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar