fbpx

शिवाजीनगरात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२१ । जळगाव शहरातील शिवाजी नगरातील लक्ष्मीनगर भागांमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.  यावेळी डंपर चालकाने पोलिसांना अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात यावेळी तक्रार दाखल करण्यात आली आहे

जप्त करण्यात आलेले डंपर (क्रमांक MH 04 gf 8686) हे किशोर सपकाळे यांच्या मालकीचे डंपर आहे. जळगाव शहरातील रस्त्यांवर सुसाट वेगाने अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावर या प्रसंगी कारवाई करण्यात आली असून डंपर पोलिसांनी जप्त केला आहे.

शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, नरेंद्र ठाकरे, तेजस मराठे या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी पुढील कारवाईसाठी शहर पोलिस पथकाने जळगांव तहसीलच्या ताब्यात दिले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज