तुमच्यात जर सकारात्मकता असेल तर कोणीही तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून थांबवू शकत नाही: ऍड. मोहन शुक्ला

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । चाळीसगाव जेसीआय सिटीचा पदग्रहण समारंभ दि. १२ जानेवारी २०२२ बुधवार रोजी सायं. ७ वा. हॉटेल रिलायबल खान्देशी कट्टा येथे संपन्न झाला. या वेळी तुमच्यात जर सकारात्मकता असेल तर कोणीही तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन एरंडोल येथील ऍड. मोहन शुक्ला यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. नंतर डॉ. प्रसन्न अहिरे यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. पुढे सर्व मान्यवरांसमोर डॉ. प्रसन्न अहिरे यांनी धर्मराज खैरनार यांना कॉलर व पिन देवून जेसीआय २०२२ सालचा अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला तसेच सचिन दिनेश चव्हाण यांनी विद्यमान सचिव मयूर अमृतकार यांनी सचिवपदाची पिन लावून २०२२ या सालचा जेसीआयचा सचिवपदाचा पदभार सोपविला.

सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ऍड. मोहन शुक्ला, अध्यक्ष, औदुंबर साहित्य रसिक मंच, एरंडोल, पाचोरा येथील जेसी एचजीएफ मयूर दायमा, झोन उपाध्यक्ष, जेसीआय झोन १३ व चाळीसगाव जेसीआय सिटीचे माजी अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी-संगमचे अध्यक्ष बालाप्रसाद राणा उपस्थित होते. ऍड. शुक्ला यांनी आपल्या मनोगतातून जेसीआयच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली व संपूर्ण जेसीआय टिमला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. प्रमुख अतिथी मयूरजी दायमा यांनी जेसीआय या संस्थेबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली.

यावेळी जेसीआयच्या सदस्यपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष धर्मराज खैरनार यांनी झालेल्या उपक्रमांविषयी माहिती देवून पुढील उपक्रमांचे नियोजन सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -