वेळ पडली तर न्याय हक्कांसाठी सरकारशी भांडू : राज्यमंत्री बच्चू कडू

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. चाळीसगाव येथेही एसटी कर्मचारी बसस्थानकासमोर आंदोलनाला बसले आहेत. मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू हे चाळीसगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेवून चर्चा केली.

सविस्तर असे की, मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू हे चाळीसगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांचे सांत्वन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने विचार व्हावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निकाल लावावा, अशी विनंती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले. या प्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री बच्चू कडू यांना विलिनीकरणाबाबत निवेदन दिले.

दरम्यान, तुमच्यासाठी सरकारची भांडू असे, आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. दरम्यान, कमी तुटपुंते व अनियमित वेतनामुळे राज्यात काही कर्मचाऱ्यांनी जीवन संपवल्याने, यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी कर्मचाऱ्यांनी मागणी केली.

स्वर्गीय उदेसिंग पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण 

उंबरखेड येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अण्णासाहेब रामसिंग पवार यांच्या पुतड्याचे १६ रोजी संस्थेच्या   वरखेडे बुद्रुक  येथील अण्णासाहेब उलिंग पवार सर्वोदय आश्रम शाळेत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार शिष चौधरी तर प्रमुख अतिथी म्हणून अन्दर किशोर पाटील, डॉ. सुधीर तांबे किशोर दराडे, डॉ. सवेश पाटील हजर होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज