आदर्श विवाह : मुलीच्या मृत्यूनंतर लावले जावयाचे लग्न

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । वरणगाव (ता.भुसावळ) येथे कोरोना काळात मुलीचा मृत्यू झाल्यानंतर जावई यांनाच मुलगा मानून त्यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी भोरगाव लेवा पंचायतीचे कुलसचिव ऍड.संजय राणे पुढाकार घेऊन गुरुवारी एक आदर्शवत गंधर्व विवाहविधी घडवून आणला.असून, हा विवाहसोहळा समाजासमोर आदर्श घडविणारा आहे.

विवाहित कन्येला गमावणाऱ्या पालकांनी जावई व दोन नातींचे कुटुंब पुन्हा फुलविले आहे. ऍड. संजय राणे यांचे बंधू मिलिंद मनोहर राणे (रा.अहमदाबाद) यांची कन्या कोमल हिचा विवाह अहमदाबाद येथील सुजित दिलीप महाजन यांच्याशी झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गामुळे कोमल हिचे ३ मे २०२१ ला निधन झाले. कोमल व सुजीत यांना दोन मुली आहेत. त्या दोघी लहान आहेत. कोमलच्या अकाली निधनानंतर जावई आणि नातींचे कुटुंब अधुरे झाले. सुजीत यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ऍड. राणे यांनी पुढाकार घेतला.

नशिराबाद (ता.जळगाव) येथील विनोद रोटे यांची घटस्फोटित कन्या हिच्यासाठी प्रस्ताव ठेवला. दोन्ही परिवाराच्या संमतीने सुजीत व लिनाचा गंधर्व विवाह गुरुवारी पार पडला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -