fbpx

मुक्ताईनगर येथील दोघांना आदर्श शेतकरी पुरस्कार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ ।  जळगाव जिल्हा परिषद मार्फत आदर्श शेतकरी पुरस्कार साठी तालुकास्तरावर प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. त्यातून सन 2020-21 व 2019-20 यासाठी निमखेडी खु येथील अनिल तापीराम पाटील व मेळ सांगवे येथील सोपान दगडू पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती च्या सभापती सुवर्णा प्रदीप साळुंके यांनी पंचायत समितीच्या सभागृहात सपत्नीक शाल, नारळ, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व रु 10000 चा चेक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्या वेळी सभागृहात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागतीलक, पंचायत समितीच्या माजी सभापती शुभागी ताई भोलाने , पंचायत समिती सदस्य, राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाने ,विनोद पाटील, प्रदीप साळुंके हे उपस्तीत होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज