जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील इच्छापुर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इच्छादेवीच्या महाआरती करण्याचे भाग्य मुक्ताईनगरच्या दापत्यांना लाभले. येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजयभाऊ सापधरे व त्यांच्या पत्नी सपना सापधरे आणि मुक्ताईनगरच्या एकात्मिक बाल विकास विभागीय सुपरवाईझरसुनीता ताई व त्यांचे पती शिक्षक कवीराज पाटील या दोघा दापंत्यांना या महाआरतीचा मान मिळाला. नवरात्री निमित्त सहपरिवार इच्छामाता मंदिरात इच्छादेवी दर्शन, पूजा आरती केली. आरती नंतर इच्छामाता मंदिराचे पुजारी दिवाकर वासुदेव गुरव महाराज यांनी दोघा परीवारांचे स्वागत करुन रुमाल टोपीसह सदिच्छा भेट दिली.
यावेळी पुजारी गणेशगुरव, वैभव गुरव, शिवम गुरव तसेच निस्वार्थपणे सेवारत इच्छादेवी ट्रस्टचे अध्यक्ष फकीरा श्रीपत तोरे, उपाध्यक्ष भगवत महाजन, संचालक लक्ष्मण पवार, रामभाऊ यावलकर,संजय पवार,विजय सपकाळे,तसेच पोलिस विभागाचे एएसआय सुरजसिंह,संदिपसिंह सोलंकी उपस्थित होते.मान्यवरांचे रुमाल टोपी देऊन सत्कारसमारंभ करण्यात आला. दरम्यान गेली दोन वर्षापासुन कोरोनामुळे नवरात्रिनिमित्त यात्रोत्सव बंद होता. कोरोना संकट टळल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात यात्रोत्सव सुरु असुन इच्छापुर्ती करणाऱ्या मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची रिघ लागत आहे.तर भाविकांचे कोणत्याही प्रकारे हाल अपेष्टा होणार नाही यासंबधी मंदिर ट्रस्टतर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. म.प्रदेशासह महाराष्ट्रातील भाविक याठिकाणी हजेरी लावतात.