आयएएस अधिकाऱ्याची बॅग लांबवणारा १२ तासातच जाळ्यात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । बराेनी – अहमदाबाद एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिला आयएएस अधिकाऱ्याची बॅग चाेरट्याने लांबवल्याची घटना ८ रोजी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर १२ तासातच खंडव्यातून चोरट्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून बॅग जप्त केली, त्यात लॅपटॉपसह एक लाख ७५ हजारांचा मुद्देमाल होता. संशयिताने घातलेली मंकी कॅप आणि मास्कवरून त्याची ओळख पटली.

बराेनी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या बी-३ डब्यातील सीट ७१ वरून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी कृती राज (रा.लालबहादूर शास्त्री अकादमी, देहरादून, मसुरी) प्रवास करत हाेत्या. त्यांची लॅपटाॅप असलेली बॅग चाेरीला गेली होती. संशयित राहुल रोकडे (रा.खंडवा) हा गाडीत खंडव्यातून बसला हाेता, बॅग चोरल्यानंतर तो भुसावळ जंक्शनवर उतरला. चोरीची घटना लक्षात येताच प्रीती राज यांनी भुसावळ जीआरपी पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील व आरपीएफ आयुक्त क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक विजय घेरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ भुसावळ जंक्शनवरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी गाडीच्या बी-३ या डब्यातून उतरलेल्या प्रवाशाच्या हातात बॅग दिसली. त्याने मंकी कॅप घालून मास्क लावलेला होता. त्याच वर्णनावरून शोध घेतला.

असा घेतला शाेध

डाेक्यात टाेपी व मास्क असल्याने संशयिताची ओळख पटत नव्हती. मात्र पाेलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना संशयिताचा फाेटाे दाखवला. तसेच संशयिताने हा बसस्थानकाजवळ सिगारेट घेतली होती. त्याला सिगारेट विक्रेता व कुलीने पाहिले होते. संशयित राहुल राेकडेची ओळख पटल्यानंतर पोलिसांचे पथक खंडव्याकडे गेले. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी संशयीताच्या खंडव्यात सायंकाळी मुसक्या आवळल्या.

यांनी केली कारवाई

पोलिस निरीक्षक विजय घेरडे, अजित तडवी, जगदीश ठाकुर, धनराज लुले, सागर खंडारे, आरपीएफचे निरीक्षक राधाकृष्ण मीना, सुरेश थोरात, सहाय्यक फौजदार प्रेम चौधरी, वसंत महाजन, पुष्पक धाकड यांनी ही कारवाई केली. पुढील तपास फौजदार संजय साळुंखे करत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -