आय.एम.आर. महाविद्यालयात लसीकरण शिबीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । आय.एम.आर. महाविद्यालय व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ८ जानेवारी 2022 रोजी आय.एम.आर. महाविद्यालय जळगाव येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी को-व्हॅक्सीन ही लस उपलब्ध राहणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबीराच्या माध्यमातून लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आय.एम.आर. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा.शिल्पा बेंडाळे व युवासेना सहसचिव विराज कावडीया यांनी केले आहे.

शहरातील प्रत्येक महाविद्यालयात युवासेना व जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीराचे आयोजन येणाऱ्या दिवसांमध्ये करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -