पत्नी-भाचा सापडले आक्षेपार्ह स्थितीत : पत्नीचा केला खून

बातमी शेअर करा

पत्नी-भाचा सापडले आक्षेपार्ह स्थितीत : पत्नीचा केला खून

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । रावेर तालुक्यातील पाल येथे आपल्याच घरात भाच्यासोबत पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे.

पाल येथील बर्डी परिसरात राहणार्‍या साधू मानसिंग बारेला व त्याची पत्नी सायजाबाई बारेला यांचा दूरचा भाचा, भायला बारेला राहणार पिंपलखुंटा (जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश) हे तिघे दारु पित बसले होते. दरम्यान भायला याने साधू यास दारू आणण्यास पाठवले. तर मानसिंग व सायजाबाई यांची मुलगी घरात होती. मुलीला देखील त्याने वीस रुपये देऊन चॉकलेट गोळ्या आणण्यासाठी दुकानाला पाठवले.

भायला याने मानसिंग व मुलगी हे दोघेही घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेत सायजाबाई सोबत आक्षेपार्ह कृत्य सुरु केले. काही वेळानंतर दारू घेऊन परतलेल्या साधू बारेलाने त्याचा भाचा भायला बारेला व पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत असताना रंगेहात पकडले. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या साधूने पत्नी सायजाबाईला लाकडी दांडक्याने हातावर, पायावर, बरगडीवर गंभीर मारहाण केली व या मारहाणीत तिला गंभीर दुखापत होऊन जागेवरच मयत झाली. भायला बारेला याने धूम ठोकली.

दरम्यान, साधू बारेला याने त्याच्या पत्नीस दि.५ रोजी सायंकाळी चार वाजता ठार मारले होते. घटना घडल्यानंतर मृतदेह रात्रभर घरातच पडलेला होता. दुसऱ्या दिवशी मयत महिलेच्या वडिलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत माहिती दिली होती.

मामा-भाच्याला केली अटक
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून महिलेचा मृतदेह रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. रावेर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून साधू मानसिंग बारेला रा.पाल, बर्डी व भायला भंगा बारेला यास पिंपलखुंटा, जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -